मनसे पदाधिकाऱ्याची हत्या; डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्राने सपासप वार करत संपवलं
मनसे पदाधिकाऱ्याची हत्या; डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्राने सपासप वार करत संपवलं
img
वैष्णवी सांगळे
निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय. अशातच या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांनी मयत बाळासाहेब सरवदे याच्या डोळ्यात चटणी टाकून इतर आरोपीनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप केला जात असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. सोलापूर महापालिका प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या दोन गटात वाद झाला. प्रभाग दोनमध्ये शालन शिंदे ह्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्याविरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 

रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी शिंदे आणि सरवदे या दोन गटात मोठा वाद झाला, या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडण्यात आले. मात्र, त्याचवेळी शालन शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्तीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

ह्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, बाळासाहेब सरवदे हत्याप्रकरणातील ४ संशयितांना सोलापुरातील जेलरोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. 

अशातच या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांनी मयत बाळासाहेब सरवदे याच्या डोळ्यात चटणी टाकून इतर आरोपीनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

या गंभीर गुन्ह्याप्रकरणी भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, शालन शिंदे यांनी मयत बाळासाहेब यांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि त्यानंतर इतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांचा जीव घेतला, असं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यामुळे आता पोलीस देखील तातडीने प्रकरणाता छडा लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group