नात्याला काळिमा , सॉफ्टवेअर इंजिनीअर मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या
नात्याला काळिमा , सॉफ्टवेअर इंजिनीअर मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या
img
वैष्णवी सांगळे
कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या मुलाने स्वतःच्याच आईवडिलांची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाचे वडील रिटायर्ड नेव्ही कॅप्टन आणि त्याची आई डॉक्टर होती. ही घटना विज्ञाननगर येथील आदर्श विस्टा अपार्टमेंटमध्ये घडली. बुधवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास या तरुणाने आई-वडिलांवर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या आई आणि वडिलांचा जागीच मृत्यू झाला. नवीन चंद्र भट (६० वर्षे) आणि डॉ. श्यामला भट (५५ वर्षे) अशी हत्या झालेल्या नवरा-बायकोची नावं होती.

तरुणाने आई-वडिलांवर चाकूने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले. कौटुंबीक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

आरोपी रोहन चंद्र भट हा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. तो स्वत:चा व्यवसाय देखील करायचा. या तरुणाने आई-वडिलांची हत्या का केली यामागचे कारण शोधले जात आहे. या तरुणाची बहीण अमेरिकेत राहते. तिला घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group