संतापजनक ! नराधम पित्याची सरपंच होण्याची इच्छा, पण 'ती' गोष्ट अडसर ठरत असल्याने लाडक्या लेकीलाच...
संतापजनक ! नराधम पित्याची सरपंच होण्याची इच्छा, पण 'ती' गोष्ट अडसर ठरत असल्याने लाडक्या लेकीलाच...
img
वैष्णवी सांगळे
सत्ता मिळवण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही.  सरपंच होण्याची इच्छा असलेल्या एका नराधम पित्याचं कृत्य ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. सरपंच होण्यासाठी नराधम पित्याने स्वतःच्याच पोटच्या ७ वर्षाच्या लेकीची हत्या केली आहे, आणि ही संतापजनक घटना नांदेडमधील केरूर गावात घडली आहे. 

नेमकं प्रकरण काय ?
नांदेडमधील केरूर गावातील रहिवासी २८ वर्षीय पांडुरंग कोंडमंगळे हे त्यांच्या गावात एक सलून चालवतात. त्यांना दोन जुळ्या मुली (वय, ७ वर्ष) आणि एक मुलगा (वय, ३) अशी तीन अपत्ये होती. पांडुरंगला आपण गावचे सरपंच व्हावे, ग्रामपंचायत निवडणूक लढवावी अशी इच्छा होती. मात्र महाराष्ट्र पंचायत राज कायदा ) त्याच्या या स्वप्नातील मोठा अडथळा ठरला. या कायद्यानुसार, दोनपेक्षा जास्त मुले असलेली व्यक्ती पंचायत निवडणूक लढवू शकत नाही.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी  पांडुरंगने सध्याचे गावचे सरपंच गणेश शिंदे यांच्याशी चर्चा केली. सुरुवातीला त्यांनी मुलीला सोडून देण्याचा किंवा दत्तक घेण्याचा विचार केला होता, परंतु जन्म प्रमाणपत्रावर तिचे नाव नोंदल्यामुळे हा पर्याय कायदेशीरदृष्ट्या धोकादायक वाटत होता. शेवटी, त्यांनी निष्पाप मुलीला संपवण्याचा भयानक कट रचला.

या कटानुसार,  पांडुरंग त्याच्या मुलीला दुचाकीवरून तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील निजामसागर कालव्यात घेऊन गेला. तिथे त्याने त्याच्या स्वतःच्या लाडक्या मुलीला थंड कालव्यात ढकलले. जवळच्या शेतात काम करणाऱ्या लोकांना काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि ते आले तेव्हा त्यांना मुलीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला.

माहिती मिळताच  निजामाबाद पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याचे फोटो सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसारित केले. एका गावकऱ्याने छायाचित्रातून मुलीची ओळख पटवली आणि ताबडतोब पोलिसांना कळवले. जेव्हा पोलिस आरोपी पांडुरंगकडे पोहोचले तेव्हा त्याने सुरुवातीला मुलीवर उपचार करण्यासाठी बाहेर गेलो असल्याचा कारण दिले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला अन् त्याने गुन्हा कबूल केला. 

याप्रकरणी  पोलिसांनी पांडुरंग कोंडमंगळे आणि कटात सहभागी असलेले सरपंच गणेश शिंदे यांच्याविरुद्ध खून आणि गुन्हेगारी कटाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपींवर शक्य तितकी कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, 30 जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी केरुर गावात येऊन कोंडामंगले यास अटक केल्यावर सदरची घटना गावकऱ्यांना समजली. पुढील तपास तेलंगणा पोलीस करत आहेत
इतर बातम्या
Join Whatsapp Group