खळबळजनक ! पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
खळबळजनक ! पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
img
वैष्णवी सांगळे
जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेनं पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

निलेश पाटील असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून कोदगाव येथील घरातच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. निलेश पाटील यांच्या अकाली निधनाने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली असून आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पोलिसांच्या तपासाला अधिक गती येईल. तसेच, कुटुंबीय आणि नातेवाईकांकडेही विचारपूस केली जात असल्याची माहिती आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group