विधानभवनाबाहेर एकाच आत्मदहनाचा प्रयत्न, परिसरात खळबळ
विधानभवनाबाहेर एकाच आत्मदहनाचा प्रयत्न, परिसरात खळबळ
img
वैष्णवी सांगळे
मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत विधानभवन परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. विधानभवनाच्या बाहेरच एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने पोलिसांनी तत्परता दाखवत त्या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतले आणि मोठा अनर्थ टळला.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. संबंधित व्यक्ती अचानक विधानभवनाच्या परिसरात आली आणि अंगावर रॉकेल ओतले,हा प्रकार लक्षात येताच तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. पोलिसांनी त्या व्यक्तीला थांबवत ताब्यात घेतले आणि त्याला पुढील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

घटनेमुळे विधानभवन परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या घटनेमागचे नेमके कारण काय आहे, तसेच त्या व्यक्तीने असे टोकाचे पाऊल उचलण्याचा का प्रयत्न केला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, विधानभवन परिसर हा संवेदनशील भाग मानला जात असल्याने येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group