पुण्यातील हिंजेवाडी आयटी पार्कमध्ये मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरने मोबाइल चार्जिंगच्या वायरने जीवन संपवलं आहे. तरुणाचा मृतदेह कॅन्टीनमधील शौचालयात आढळला. हा तरुण टीसीएसमध्ये काम करीत होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले.
सुजल विनोद ओसवाल असं या तरुणाचं नाव आहे. तो २४ वर्षांचा होता. विनोद हा हिंजेवाडी फेज-३ येथील टिसीएस कंपनीत काम करीत होता. तो मूळचा पुण्याच्या वानवडी भागात राहणारा होता. टाटांच्या कंपनीत तो सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून रुजू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल कंपनीच्या कँटीनजवळील शौचालयात गेला आणि येथेच त्याने मोबाइल चार्जिंग केबलच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत सूचना मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात आर्थिक अस्थिरता आणि मानसिक दबाव कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर
सुजलने आत्महत्येपूर्वी त्याच्या जवळच्या नातेवाईकांना मेसेज पाठवला होता. यामध्ये त्याने ऑनलाइन सट्टा-बेटिंगमुळे आर्थिक नुकसान झाल्याचा उल्लेख होता. या आर्थिक अडचणीतून तो मानसित तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्येसारखं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.