अजितदादांचा भाजपला जोरदार धक्का ,बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
अजितदादांचा भाजपला जोरदार धक्का ,बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
img
वैष्णवी सांगळे
भाजपला पिंपरीत राष्ट्रवादीनं जशास तसे उत्तर दिलंय. दोन दिवसापूर्वी १५ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश सोहळा झाला होता ज्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला होता. आता अजितदादांना भाजपचा बडा चेहरा राष्टवादीत घेत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. 

संपूर्ण पॅनल विजयी करण्याची ताकद असलेले भाजपचे पिंपरी गावातील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी हाती घड्याळ बांधलंय. पुणे शहरातील बारामती होस्टेल येथे स्वतः अजित पवार यांनी वाघेरे यांचे स्वागत केलं. वाघेरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे माजी उपमहापौर डब्बू आसवाणी आणि संदीप वाघेरे मिळून संपूर्ण पॅनल जिंकण्याची शक्यता वाढलीय. 

दरम्यान माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यासह माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे आणि ११ माजी नगरसेवकांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

इतक्या नेत्यांचे भाजप प्रवेश होणं हे राष्ट्रवादीसाठी धक्का मानलं जात होतं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं या धक्क्याचा बदला आज घेतलाय. आज संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानं भाजपमधील अनेक ताकदीचे उमेदवार राष्ट्रवादीच्या संपर्कात आलेत. वाघेरे यांच्या राष्ट्रवादीती प्रवेशाचा परिणाम परिसरातील दोन-तीन प्रभागांवर होण्याची शक्यता आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group