8.46 वाजता विमान अपघात, 8.37 वाजता श्रीजीत पवारांना कॉल; शेवटच्या कॉलवर अजित पवार नेमकं काय बोलले ?
8.46 वाजता विमान अपघात, 8.37 वाजता श्रीजीत पवारांना कॉल; शेवटच्या कॉलवर अजित पवार नेमकं काय बोलले ?
img
वैष्णवी सांगळे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. २८ जानेवारीला बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघाताने अजितदादांना हिरावून नेले. या धक्क्यातून बारामतीकर अद्याप सावरलेले नसतानाच, आता अजितदादांचे चुलत पुतणे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांनी दादांसोबतच्या शेवटच्या संभाषणाची 'कॉल रेकॉर्डिंग' सार्वजनिक केली आहे. मृत्यूच्या अवघ्या ९ मिनिटांपूर्वी दादा नेमकं काय बोलले होते, हे ऐकून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.

श्रीजीत पवार म्हणाले, अजित पवार यांचा लास्ट कॉल 8 वाजून 37 मिनिटांनी आहे. एका विषयावर मी अजित पवार यांच्याशी बोलणार होतो. 8.19 मिनिटांनी मी अजित पवार यांना मेसेज केला. रेंजमध्ये मेसेज मिळताच मला अजित पवार यांनी मला फोन केला. 8.37 वाजेपर्यंत अजित पवार बोलत होते. विमानात असताना अजित पवार यांनी फोन केला होता, असं श्रीजीत पवार म्हणाले. दरम्यान, अजित पवारांच्या विमानाचा अपघात साधारण 8.46 वाजता झाला होता. 

जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारी बाबत श्रीजीत पवार आणि अजित पवारांचं शेवटचं बोलणं झालेलं. यामध्ये सर्व जाती धर्म सोबत आपण राहत आहोत सगळ्यांना न्याय देण्याचा पण काम करू , असं अजित पवार श्रीजीत पवारांना म्हणाले. तसेच माळी समाजाला मी जिल्हा परिषद उमेदवारी दिली आहे. बाकीचे कोणी दिली नाही, इतर पक्षांनी कोणी दिले नाही आपण ती दिलेली आहे, असं अजित पवार फोनवर बोलत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group