...तो मोकाट सुटायला नको ;सगळ्या बॉडी जळाल्या,पण कागदपत्रं तशीच राहिली, ऐनवेळी दोन्ही पायलट का बदलले? रुपाली पाटील नक्की काय म्हणाल्या ?
...तो मोकाट सुटायला नको ;सगळ्या बॉडी जळाल्या,पण कागदपत्रं तशीच राहिली, ऐनवेळी दोन्ही पायलट का बदलले? रुपाली पाटील नक्की काय म्हणाल्या ?
img
वैष्णवी सांगळे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर आता दररोज अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. बुधवारी २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान क्रॅश झाले आणि यामध्ये त्याच्या ६ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले.मात्र ती सहावी व्यक्ती कुठे आहे? असा सवाल आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. तसेच ऐनवेळी पायलट का बदलला गेला आणि एकाचवेळी दोन्ही पायलट कसे ट्राफिकमध्ये अडकू शकतात असा सवाल रूपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केला.

अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त करत रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, "आज पाच दिवस झाले, आमचा मेंदू बधीर झाला आहे. अजित पवार सकाळी ८ वाजता ज्या विमानाने येणार होते, त्याचे पायलट आणि को पायलट दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकले आणि ऐनवेळी बदलले गेले. ते का करण्यात आलं? विमान खाली घेण्याची सूचना कुणी केली? आधी सहा माणसं या विमानात असल्याचं सांगितलं गेलं. मृत्यू पाच जणांचा झाला. मग सहावा माणूस कुठे गेला?"

रुपाली पाटील पुढे म्हणाल्या की, "लँडिंगच्यावेळी अडचणी असताना ते विमान खाली घेण्याची सूचना कुणी दिली? अडचण असेल तर ते विमान पुणे, सोलापूर किंवा इतर ठिकाणी उतरवायला हवं होतं. मात्र तसं न करता बारामतीमध्येच का उतरवलं?" विमान अपघातात सगळ्या बॉडी जळाल्या, पण कागदपत्रं तशीच राहिली. त्यामुळे हा अपघात आहे की त्यामागे काही कटकारस्थान आहे याची चौकशी झालीच पाहिजे. आपण हा अपघात असल्याचं म्हणू आणि दुसरीकडे ज्याने हे कटकारस्थान केलं आहे तो मोकाट सुटायला नको असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या. 

अजितदादांचा अपघात ही संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी आहे. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात? हा प्रश्न फक्त रुपाली पाटील ठोंबरेंचा नाही, प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीचा आहे. त्यामुळे याची चौकशी करावी अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group