उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला एक महिना उलटून गेला आहे. या अपघातावर अनेक शंका रोहित पवार यांनी उपस्थित केल्या आहेत. मुंबईसह दिल्लीतही पत्रकार परिषद घेत त्यांनी खळबळजनक दावे केले. अशातच दोन दिवसांपर्वी आलेल्या डीजीसीएच्या अहवालाबाबत आज काही मुद्दे मांडण्यासाठी रोहित पवारांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना रोहित पवारांनी विमान अपघाताच्या अहवालाबाबत बेसिक निरीक्षणच चुकल्याचं म्हटलंय.
रोहित पवार काय म्हणाले ?
मी व्हीएसआर किंवा डीजीसीए यांच्या विरोधात नाही. व्हीएसआर, डीजीसीए आणि एरो या कंपन्यांना मी टार्गेट मी करत नाही, मात्र यांना कोणीतरी डीजीसीएच्या माध्यमातून वाचवत आहे हे आपल्याला दिसून येत आहे, रिपोर्टमध्ये म्हटले आहे की ते लेअर जेटचे विमान होते. हा पूर्व नियोजीत दौरा नव्हता आपण म्हटला होतं तेही मान्य करण्यात आले आहे. ॲाफिशियल ऐजच्या ३००० तास जास्त हे विमान चालले होते. आमची अपेक्षा होती की या अहवालात चुका होऊ नये. पण त्या झाल्या. यांनी बारामतीला जिल्हा करून टाकला. एएआयबी (AAIB) किती गंभीर आहे यावरून ते दिसून येते असं म्हणत रोहित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर रोहित पवारांनी विमान पडतानाच्या व्हिडीओचा स्क्रिनशॉट दाखवत, अहवालात मांडलेले मुद्दे सांगत सविस्तर माहिती देताना म्हटलं की, व्हिडिओ पाहिल्यावर विमान राईट बँक झालं नव्हतं. तर लेफ्टला पडलं होतं. हे दिसून येत आहे, पण रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट चुकली आहे. या रिपोर्टमध्ये बेसीक जी गोष्ट आहे, गोळी कुठं लागली हे जर आपण विचारायला गेलं, तर डोक्याला लागली की पोटात लागली, जर डोक्यात लागली असेल तर इथे(अहवालात) सांगण्यात आलंय की छातीत लागली, इथे बेसिक निरीक्षण(Observation)एआयबी या संस्थेचं चुकलंय असं आमचं मत आहे, असंही रोहित पवारांनी सांगितलं आहे.
रिपोर्टमध्ये झाडं आहेत असं सांगितलंय, इथं कुठं झाडं आहेत, इथे झुडूप आहे, त्या झुडूपाला कुठेही विमान टचही झालेलं नाही, झाडाची आणि विमानाची उंची कुठेच मॅच होत नाही, आणि रिपोर्ट द्यायचा म्हणून दिली की झाडांवर जबाबादारी ढकलून द्यायची म्हणून असा केविलवाणा प्रयत्न एआयबीकडून झाला असं आपल्याला म्हणावं लागेल असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.