राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस उमेदवार देईल, 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस उमेदवार देईल, 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य
img
वैष्णवी सांगळे
अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. दरम्यान बारामती विधानसभेची जागा अद्यापही रिक्त आहे. यासाठी विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या भूमिकेमुळे सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे. 

‘बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस उमेदवारीबाबत विचार करेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार देणार नसल्याचं बोलल्यानंतर वडेट्टीवार यांनी हे मोठे वक्तव्य केलं आहे. शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. जर तिकडे राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही तिकडे निवडणूक लढायचा विचार करू. पवार विरुद्ध पवार निवडणुका यापूर्वी झाल्या आहेत. ही जागा राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. विलिनीकरण हा विषय होता तेव्हा काँग्रेसशी चर्चा केली नव्हती. आता निवडणुका होत आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या सुनेत्रा वहिनीविरोधात कसा उमेदवार देणार. त्यांची भूमिका महाविकास आघाडी म्हणून मान्य नाही. जर राष्ट्रवादी लढणार नसेल तर काँग्रेसला तिथे उमेदवार देण्याबाबत विचार करावा लागेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- 
निवडणुकीची अधिसूचना जारी :  30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026
इतर बातम्या
Join Whatsapp Group