अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड होणार ? , घडामोडींना वेग
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड होणार ? , घडामोडींना वेग
img
वैष्णवी सांगळे
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण असणार याबाबत अस्पष्टता होती. सुनेत्रा पवार यांनाच ही जबाबदारी मिळावी अशी मागणी अनेक नेत्यांकडून होत होती आता  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड येत्या एका महिन्याच्या आत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. 



अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीतच ही निवडणूक पक्षांतर्गत पद्धतीने पार पाडण्याचा विचार असून, राज्यातील पदाधिकारी तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य यांच्या सहमतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवड पुढल्या एक महिन्याच्या आधी करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. अर्थसंकल्प अधिवेशन कालावधीतच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष निवडणूक पार्टी अंतर्गत करण्याच्या हालचाली सुरु आहेत. पार्टीचे पत्र राज्यातील पदाधिकारी तसंच राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या सहमतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड बिनविरोध होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करा, अशी मागणी आमदारांकडून करण्यात आल्यानंतर आता पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही ही मागणी उचलून धरली आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पक्षातील 30 हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पक्षाचे अध्यक्ष बनवा, अशी मागणी केली आहे. त्यांनी हे पत्र सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना पाठवले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group