१३ मे २०२६
बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाले. अजितदादांसह अन्य ५ जणांचा आपले प्राण गमवावे लागले. अजितदादांचा विमान अपघात झालेल्या गावातच आणखी एक विमान कोसळल्याची घटना झाली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
हे ट्रेनिंग विमान होतं. प्रशिक्षण देणारं विमान होतं. यात विमानाचं नुकसान झालं आहे. पण सुदैवाने वैमानिकाचे प्राण वाचले. तो सुरक्षित आहे. गोजुबावी गावच्या हद्दीत हे शिकाऊ विमान कोसळलं आहे. रेडबर्ड कंपनीचं हे शिकाऊ विमान होतं.
दरम्यान , ही घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विमान कशामुळे पडलं हे मात्र समजू शकले नाही? विशेष म्हणजे अजित पवारांच्या विमानाचा अपघात गोजुबावी गावातच झाला होता.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा २८ जानेवारीला अपघात झाला होता. अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली होती. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये दाखल होणार होते. विमान लँडिंग वेळी हा अपघात झाला होता. गोजुबावी येथे विमान उतरत असताना हा अपघात झाला. \
या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली होती. लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत २९ जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
Copyright ©2026 Bhramar