दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत माहिती समोर आली आहे. या सगळ्या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी एका खासगी माध्यमाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही आमच्या पातळीवर तपास केला. त्यातील अनेक गोष्टी खऱ्या असल्याचं समोर येत आहे. आम्हाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वेळ दिला नाही, कारण त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत नव्हते. त्यामुळे त्यांचं काम अमित शाह करत असतील, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. उद्या आणखी एक पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. बरेच महत्वाचे मुद्दे मांडणार आहोत, असंही रोहित पवारांनी सांगितले.
सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचं अपघातावर काय म्हणणं आहे?, असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला. यावेळी अपघात झाल्यानंतर याबाबत पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्याशी माझी चर्चा झाली होती. आता 13 दिवस झाल्यानंतर ते त्यांचं राजकारण करत आहेत. आम्ही आमचं समाजकारण करत आहोत. अजित पवारांच्या तेराव्या नंतर मी त्यांना भेटलो नाही, असं रोहित पवार म्हणाले.