राज्यातील राजकारणात पक्षांतर , आरोप प्रत्यारोप हे सुरूच असत . दरम्यान , आता राजकारणातील एका हालचालीमुळे मोठी खळबळ निर्माण झाली असून चर्चाना युद्ध आले आहे. मिळालेल्या माहितींनुसार, आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि अजित पवारांच्या अतिशय जवळचे मानले जाणाऱ्या सुनील शेळके यांनी मोठा दावा केला आहे. रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले सुनील शेळके?
सुनील शेळके म्हणाले, रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. 2029 ची निवडणूक रोहित पवार काँग्रेस पक्षातून बारामतीमधून लढण्याची त्यांची इच्छा आहे. रोहित पवार दिल्लीत जाऊन राहुल गांधींना भेटले आहेत ते काँग्रेसमध्ये जाण्यास तयार आहेत. जर मी बोलतो ते खरं नसेल तर रोहित पवारांनी पुढे येऊन सांगावं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर मी पक्ष सोडणार नाही.
पोटनिवडणुकीत देखील रोहित पवारांनीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार द्यावा अशी मागणी केल्याचा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला आहे. विलणीकरण करायचं म्हणजे कुणीतरी चर्चा करायला हवी, कोणत्या पक्षाचा कोणत्या पक्षात करायचं हे त्यांनी येऊन चर्चा करायला हवी... रोहित पवारांनी स्वतःच्या पक्षाचं वाटोळे केलं आता ते दुसऱ्याच्या पक्षात लक्ष घालत आहे. रोहित पवार यांनी त्यांचा तुतारी हा पक्ष संपवला, असे म्हणत आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.