राजकारणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा?
राजकारणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा?
img
Nandini khandare More



सध्या राजकारणातील घडामोडींना वेग आला असून राजकीय पक्षांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, आता रोहित पवार यांच्या एका वक्तव्याने राजकीय पक्षांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.  ''आम्हीही त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा देऊ” असं वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. 

ते म्हणत होते की , “नितेश राणे बिळाच्या बाहेर ये. शेतकरी हिंदू नाहीत का ?. शिवाजी महाराज, महात्मा फुले आदींचे अपमान होतात, त्यावेळी कुठे बिळात लपतोस?. तुमची उंची आम्हाला कळली. वरिष्ठांकडून आदेश आल्यावर नाचायला लागतात. भूमिका, विचार, कपडे बदलतात तसे पक्ष बदलतात” अशा शब्दात रोहित पवार यांनी नितेश राणेंना आव्हान दिलं. “आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत. तुम्ही पण शेतकऱ्यांसाठी लढा. नेत्यांना खुश करण्यासाठी हे आमदार बोलताहेत. शेतकऱ्यांच्या कांद्याला एकनाथ शिंदे यांनी योग्य भाव दिला, तर आम्हीही त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा देऊ” असं रोहित पवार म्हणाले.

तसेच,  “ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांची मुले पुढे जातात आणि गरिबांची पोरं मागे राहतात. पेपर फुटी प्रकरण मागे देखील झाले होते. पेपर फुटल्याने तिघांनी आत्महत्या केली” याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधलं.

“एक दोन व्यक्ती टार्गेट केले गेले. खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. त्याला पोलिसात मारले जाऊ शकते. महिलांवर अन्याय केले ते चुकीचेच,कारवाई झाली पाहिजे. काळी बाहुली, रक्त हे कोणासाठी केले होते? आमचा त्यावर विश्वास नाही, पण त्याचा शोध घेतला पाहिजे. खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. सामन्यांचे व्हिडिओ बाहेर आणले, मोठ्यांचे व्हिडिओ कपाटात ठेवले” अशी टीका रोहित पवार यांनी केली.

“पक्षाचा नेता असल्याने राज्यात विविध दौरे करावे लागतात. त्यांचे इतर आमदार होते ना विषय मांडायला. मग काढायचे असेल तर सर्वांचेच काढा. दिल्लीत आणि येथे पण. मग आकडा पार पंतप्रधान साहेबांपासून निघेल” असं रोहित पवार उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळातील उपस्थितीवर म्हणाले.



इतर बातम्या
Join Whatsapp Group