'त्या प्रवासाचा उद्देश काय' ? अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवार स्पष्टच बोलले
'त्या प्रवासाचा उद्देश काय' ? अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवार स्पष्टच बोलले
img
वैष्णवी सांगळे
अजित पवार यांचे २८ जानेवारीला बारातमीजवळ विमान अपघातात निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अजित दादांच्या अपघातावर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये शंकेचं काहूर माजलं आहे. अजित पवारांचा घातपात झाल्याचाही संशय राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची कठोर चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. अशातच अजितदादांच्या विमान अपघातावर आमदार रोहित पवार यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.

'अजितदादांचा अपघात झाला, ते स्वप्न होतं. मला असं वाटत होतं. कधीपर्यंत...जेव्हा दादांचा एक स्वेटर जळालेला, पायात चप्पल, हातात बंद घड्याळ...दादा कधीही त्यांचा वेळ १५ मिनिटे पुढे ठेवायचे. ते बंद घड्याळ मी बघितलं. ज्यांनी बघितलं ते निशब्द झाले होते. जी घटना झाली नाही, असं ज्यांना वाटतं. पण ही घटना झाली आहे. आज अजितदादा नसले तरी, तरी विचाराने ते आपल्यासोबत आहेत, असे त्यांनी सांगितले.

अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय; रोहित पवारांकडून गंभीर प्रश्न उपस्थित, एखाद्या व्यक्तीला ठार करायचं असेल तर...

अपघाताच्या दिवशी काय घडलं?
दादांच्या अपघाताच्या दिवशी 7 वाजून 2 मिनिटाला क्रूर पोहोचले. कॅप्टनने चेक केलं. बारामती एअरपोर्टला फोन केला असेल. व्हिजीबिलीटी आहे का विचारलं. 7 वाजून 10 मिनिटाने ओकेचा मेसेज आला. दादांचे पीसए विदीप जाधव आले. दादा 7.30 वाजता पोहोचले. विमानाने उड्डाण केले. 8.22 ला विमान लोणावळा. 8.25 वाजता पुण्याजवळ, 8.30 वाजता यवतला. 8.32 ला सुपेजवळ पोहोचले. त्यानंतर 8.43 ते 8.45 दरम्यान अपघात होता. 9 वाजता दादा जखमी असल्याची बातमी आली. पण 9.45 वाजता दादा गेल्याची बातमी आली. त्यामुळे मन आणि डोकं सुन्न झालं.ले.

तांत्रिक बाजू मांडताना रोहित पवार म्हणाले की, "लेअरजेट (बंबार्डिअर) हे ५१,००० फुटांपर्यंत उडू शकणारे अतिवेगवान विमान आहे. अशा विमानाचे उड्डाणापूर्वी रीतसर इन्स्पेक्शन (तपासणी) झाले होते का? जर झाले असेल, तर ते करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे." तसेच, अपघाताच्या दोन दिवस आधी हे विमान 'मुंबई-सुरत-मुंबई' असे फिरून आल्याने त्या प्रवासाचा उद्देश काय होता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी रोहित पवार यांनी अपघातानंतर VSR कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांची प्रतिक्रिया दाखवली. विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेन्टेन्ड होते, वैमानिक अनुभवी होते. अपघात विसिब्लिटी इशूमुळे झाल्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया विजय कुमार सिंग यांनी दिली होती. पण स्थानिकांच्या प्रतिक्रिया पाहता विमान कंपनीच्या मालकाचा दावा पूर्णपणे खोटा ठरत असल्याचं रोहित पवार म्हणाले. विमानात यांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

टेक-ऑफ पूर्वी विमान चेक करण्यात आले नव्हते का? चेक करणारे कोण होते? विमानाचा रुटीन मेन्टेन्स झाला नव्हता का? असे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले. वीएसआर कंपनीच्या विमानाचा अपघात 2023 मध्ये सुद्धा देखील घडला होता. मुसळधार पाऊस आणि कमी विसिबिलीटीमुळे मुंबई विमानतळाच्या रनवेवरुन घसरलं होतं. पण त्या घटनेचा अहवाल अजून सादर केलेला नाही, असं रोहित पवार म्हणाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group