रोहित  पवार पुढील पाच वर्ष महाराष्ट्राची... शरद पवार यांचे रोहित पवारांविषयी मोठं वक्तव्य
रोहित पवार पुढील पाच वर्ष महाराष्ट्राची... शरद पवार यांचे रोहित पवारांविषयी मोठं वक्तव्य
img
दैनिक भ्रमर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे . पक्षांनी आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे . त्या अनुषंगाने नेत्यांचे दौरे आणि बैठक सुरु आहेत. विधानसभा निवडणुकांवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे . दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोहित पवारांविषयी मोठे वक्तव्य केले आहे. 

 रोहित पवार यांनी विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी त्याला सांगितले की कर्जत जामखेड हा दुष्काळी भाग आहे. तिथे काम करण्याची तुला चांगली संधी आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून विधानसभा निवडणूक लढवली. रोहितची पहिली पाच वर्षे ही तुमची सेवा करण्यासाठी होती. आता पुढील पाच वर्ष रोहित महाराष्ट्राची सेवा करेन, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते तथा मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीचे सरकार आले तर रोहित पवार हे मंत्री असतील, असेच शरद पवार यांनी अप्रत्यक्ष सांगितले. त्यांच्या घोषणेने रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट आहे.

शरद पवार यांनी रोहित पवार यांनी गत पाच वर्षात केलेल्या कामाचे कौतुक केले. रोहित पवार हे मला मंत्री करा असे कधीही बोलले नाहीत. मीही पहिले पाच वर्ष मंत्री नव्हतो. 1972 नंतर मी मंत्री झालो. वसंत दादांच्या काळात मी मंत्री होतो. त्यांचे सरकार गेल्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. रोहितने गत पाच वर्षे तुम्हा कर्जत जामखेडकरांची सेवा केली. आता पुढील पाच वर्षे रोहित महाराष्ट्राची सेवा करेन, असे पवार म्हणाले.

सर्वसामान्य माणसांसाठी एमआयडीसी सारख्या चांगल्या प्रश्नाला इथल्या माजी लोकप्रतिनिधीने विरोध केला. अडथळे आणण्याचे काम केले. तुम्ही कसले भूमिपुत्र..? दहा वर्ष तुम्ही आमदार होतात. पाच वर्षे मंत्री होतात, तरीही सर्वसामान्य माणसांचे एकही प्रश्न तुम्ही सोडू शकले नाहीत. तुम्ही भूमिपुत्राच्या गप्पा मारू नये, अशी जोरदार टीका शरद पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्यावर केली.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून जामखेड तालुक्यातील खर्डा येथे एकूण 25 कोटी 15 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज युवराज भूषणसिंहराजे होळकर, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group