राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडताच भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. पुण्यामध्ये भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी झाले आहे. २२ दिग्गज नेते एकाचवेळी भाजपात प्रवेश कऱणार आहेत. त्यामध्ये आमदारपुत्राचाही समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वडगाव शेरी विधानसभेचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, माजी नगरसेवक विकास दांगट, माजी नगरसेवक बाळा धनकवडे, माजी नगरसेविका सायली वांजळे, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षातील २२ माजी नगरसेवक पदाधिकार्यांचा आज भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे.
शुक्रवारी भाजपची पुण्यात महत्वाची बैठक पाडली. यामध्ये आज होणाऱ्या "मेगा प्रवेशा" बाबत चर्चा झाली. पुण्यातील विविध पक्षाचे अनेक माजी आजी नगरसेवक, पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश कऱणार आहेत. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित प्रवेश होणार आहे.