राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दरम्यान स्थानिक पातळीवर कुठे युती, आघाडीत एकी तर कुठे बिघाडी पहायला मिळत आहे. रायगडमधून अशीच एक बातमी समोर आली आहे. येथे महायुतीत बिघाडी झालीय. राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेत असलेल्या रायगड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय.
महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केलीय. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी याबाबत माहिती दिलीय. महाड नगर पालिकेत १५ जागा राष्ट्रवादी आणि 5 जागा भाजपला देण्यात येतील असं गणित ठरल्याची माहिती माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिलीय. तर नगराध्यक्ष पदाबाबत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे घोषणा करणार आहेत.