मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अंबरनाथच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या उमेदवारासाठी देवेंद्र फडणवीस यांची आज जाहीर सभा होणार आहे. पण त्याआधीच उमेदवाराच्याच कार्यालयावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील नवीन भेंडीभाडा परिसरात मध्यरात्री एक खळबळजनक घटना घडली असून भाजपचे प्रभाग क्रमांक ४ क मधील उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तींनी कार्यालयावर ४ राऊंड फायर गेल्या. या घटनेमुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात सुदैवाने कुणीही जखमी अथवा मृत झाल्याची नोंद नाही.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे,घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करत तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.