वातावरण तापलं ! भाजपच्या नेत्याने शिंदेंच्या शिवसेना नेत्याच्या कानशिलात लगावली
वातावरण तापलं ! भाजपच्या नेत्याने शिंदेंच्या शिवसेना नेत्याच्या कानशिलात लगावली
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात सर्व काही आलबेल नाही. फोडाफोडीच्या राजकारणचा मुद्दा घेऊन एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीवारी देखील केली होती. त्यांच्यात बराच वेळ चर्चा देखील झाली. ठाण्यात हा वाद जरा जास्त मिळत असताना आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेच्या नेत्याला भाजपच्या नेत्याने मारल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठाण्यातील पाकपाडी परिसरात शासनाच्या घर निर्मिती योजनेच्या जल्लोषादरम्यान एक वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात, शिंदे सेनेच्या शाखा प्रमुखाला भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'शिंदे सेनेच्या शाखा प्रमुखाला भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी कानाखाली लगावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.'

या घटनेनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात नारायण पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे भविष्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शासनाने मुद्रांक शुल्क माफ केल्याच्या घोषणेनंतर आयोजित कार्यक्रमात हा प्रकार घडला. नेमकं कोणत्या कारणामुळे शिवसेना-भाजपचे नेते भिडले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून तपास सुरु आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group