मोठी बातमी ! काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदाराचा राजीनामा, भाजप प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब
मोठी बातमी ! काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदाराचा राजीनामा, भाजप प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब
img
वैष्णवी सांगळे
मराठवाड्यात भाजपाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. आमदार प्रज्ञा सातव आज भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज त्यांनी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज विधिमंडळाच्या सचिवांकडे आपला राजीनामा दिला आहे. त्या आजच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज (18 डिसेंबर) काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेस विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या पक्षप्रवेशाबाबत तथ्य नसल्याचे म्हटले असले, तरी प्रज्ञा सातव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय समीकरणांना वेग आला आहे. 

स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, कोरोना महामारीदरम्यान त्यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती.

दरम्यान, प्रज्ञा सातव आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी समर्थकांसह आल्या आहेत. हिंगोलीतून आलेल्या कार्यकर्त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. 'राजीव सातव अमर रहे' म्हणत नारे देण्यात आले. हिंगोलीतून मोठ्या प्रमाणात सातव यांचे कार्यकर्ते भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group