काँग्रेसला मोठा धक्का ! शहराध्यक्षांसह १२ नगरसेवक भाजपचे कमळ हाती घेणार
काँग्रेसला मोठा धक्का ! शहराध्यक्षांसह १२ नगरसेवक भाजपचे कमळ हाती घेणार
img
वैष्णवी सांगळे
राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना पक्षांतर देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सर्वात जास्त इनकमिंग सध्या भाजपमध्ये सुरू आहे. दरम्यान आता भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये काँग्रेसमधून मोठा पक्षप्रवेश होणार आहे.



हल्ल्यानंतर इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ’१६ तारखेनंतर तुम्हाला कळेल…’

अंबरनाथ नगरपरिषदेत मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपशी युती केली होती. त्यानंतर काँग्रेसकडून आज मंगळवारी या १२ नगरसेवकांचं निलंबन केलंय. काँग्रेसने निलंबित केल्यानंतर अंबरनाथचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील हे १२ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी हा पक्षप्रवेश होत आहे. दरम्यान यावेळी बोलताना प्रदीप पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  हर्षवर्धन सपकाळ यांनी माझ्याकडून ब्लॉक अध्यक्ष पदासाठी एक कोटीची मागणी केली असा आरोप प्रदीप पाटील यांनी केला आहे. 

हर्षवर्धन सपकाळ यांना या युती संदर्भात आम्ही सांगितलं होतं,  त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आम्ही लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं प्रदीप पाटील यांनी म्हटलं आहे.  कारवाई केली हे अत्यंत चुकीचं आहे,  काँग्रेसने निवडणुकीमध्ये एकदाही आम्हाला विचारलं नाही, आम्ही आमच्या जोरावर निवडून आलो असंही यावेळी पाटील यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group