चर्चा फक्त शिंदेसेनेची ! ऐन निवडणुकीत भाजप-काँग्रेससह ठाकरे बंधूंनाही धक्का
चर्चा फक्त शिंदेसेनेची ! ऐन निवडणुकीत भाजप-काँग्रेससह ठाकरे बंधूंनाही धक्का
img
वैष्णवी सांगळे
महापालिका निवडकांच्या पार्शवभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहे. भाजप , मनसे, शिवसेना ठाकरे गटासोबतच काँग्रेसला मोठं खिंडार पडले आहे.राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचारात सर्वच नेते प्रचारात व्यस्त असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव टाकला आहे. एकनाथ शिंदे हे दररोज वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत आहेत.  शिंदेंनी इतर पक्षांना धक्का दिला आहे. नेरूळ विभागातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी शिवसेनेची ताकद वाढली आहे. 



मी ६ जन्माला घातली, तुम्ही २० घाला, तिकडे जाऊन १० नव्हे तर २० मुलं जन्माला घाला, नवनीत राणा-ओवैसी आमनेसामने

नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरूळ विभागातील उबाठा गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी तसेच मुंबई शहरातील धारावी विभागातील राष्ट्रीय काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. 

नवी मुंबईतील भाजप उपाध्यक्ष राजू तिकोने, नेरूळचे महामंत्री शशिकांत मोरे, वॉर्ड अध्यक्ष भरत म्हात्रे, नेरूळ भाजपा उपाध्यक्ष सोनपा घोलप, उबाठा गटाचे माजी शाखाप्रमुख प्रतापसिंह विसाळ, माजी विभागप्रमुख सुनील हुंडारे, मनसेचे विभाग अध्यक्ष नितीन नायकडे, युवा सचिव ऋषिकेश भुजबळ, तालुका सचिव अक्षय शिरगावकर, वॉर्ड अध्यक्ष सुजित भोर, सागर जोगाडिया, आशिष कदम, गुरुदास गर्जे, अमित पवार आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. 

तर धारावी काँग्रेसचे दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष शिवलिंग व्हटकर, मुंबई युवक काँग्रेसचे महासचिव विकी व्हटकर, धारावी विधानसभा उपमुख्य समन्वयक विनायक पोळ, ब्लॉक अध्यक्ष सुरेश मोगला, जयेश मुदलीयार, रोशन शेख, महेश तावरे आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. तर मनसेच्या विभाग सचिव सविता बोबडे, दीपक नारायणे, राजेश कुमार पारयार, धनाशेखर पारयार, सुरेश बेडगिरी यांचा समावेश होता. 

यावेळी खासदार नरेश म्हस्के आणि माजी नगरसेवक नामदेव भगत, काशीनाथ पवार तसेच शिवसेनेचे धारावी आणि नवी मुंबईतील स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group