बिश्नोई गँगकडून भाजप नेत्याला खंडणीसाठी धमकी
बिश्नोई गँगकडून भाजप नेत्याला खंडणीसाठी धमकी
img
वैष्णवी सांगळे
मनोरंजन क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र प्रत्येकच क्षेत्रात कलाकारांना , नेत्यांना धमकी देऊन बिश्नोई गँग स्वतःचा दबदबा निर्माण करू पाहत आहे. सलमान खान, रोहित शेट्टी अनेकांना या गँगकडून धमक्या देण्यात आहे. आता बिष्णोई गँगने भाजप नेत्यालाच धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. बिश्नोई गँगकडून अकोल्यातील भाजपच्या बड्या नेत्याला खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आहे. 

सिग्नल ॲपद्वारे भाजपच्या पाधिकाऱ्याला बिश्नोई गँगमधील शुभम लोणकरने 2 कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिली आहे. अकोट मतदारसंघांचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडून 2 कोटी वसूल करून दे, अशी भाजपच्या शहराध्यक्षाला धमकी देण्यात आली आहे.

दरम्यान, या संबंधित अत्यंत गोपनीय पद्धतीने आलेल्या धमकीसंदर्भात अकोला पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित भाजप पदाधिकाऱ्याला बंदूकधारी पोलिसांची सुरक्षा मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. साधारणत तीन ते चार दिवसांपूर्वी एका ॲपद्वारे धमकीचा कॉल आला होता. आमदार भारसाकळे यांच्याकडून दोन कोटी रुपये वसूल करून द्यावे, अन्यथा तुला आणि आमदाराला पाहून घेईल, अशी धमकी बिश्नोई गँगमधील शुभम लोणकर याने भाजपच्या शहराध्यक्षाला दिली असल्याची माहिती समोर येतीये. 

मात्र, या संदर्भात जास्त माहिती नसल्याचं अकोला पोलिसांकडून सांगितण्यात आलंय. असं असलं तरी आकोट शहरात अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
BJP |
इतर बातम्या
Join Whatsapp Group