मोठी बातमी ! भाजपचे उमेदवार दीपक बडगुजर यांची 'या' प्रभागातून माघार
मोठी बातमी ! भाजपचे उमेदवार दीपक बडगुजर यांची 'या' प्रभागातून माघार
img
वैष्णवी सांगळे
नाशिक महानगरपालिका निवडणुकांची सध्या रणधुमाळी सध्या सुरु आहे. तर नाशिकमध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अशातच नवीन नाशिक मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे उमेदवार दिपक सुधाकर बडगुजर यांनी माघार घेतली आहे.

आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत आहे. यादरम्यान, नविन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक २५ ड मधून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले दिपक सुधाकर बडगुजर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशान्वये प्रभाग क्र. २५ ड मधून अर्ज माघारी घेत आहे, मात्र प्रभाग क्रमांक २९ अ मधून ते निवडणुक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.







Nashik | BJP |
इतर बातम्या
Join Whatsapp Group