राजकारणावर शोककळा पसरली आहे. भाजपमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, समाजसेवक आणि माजी अध्यक्ष वीरेंद्र पांडे यांचे मंगळवारी आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते. दिल्लीतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चनचौरा पंचायतसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
वीरेंद्र पांडे हे उत्तरप्रदेशच्या रसलपूर चनचौरा पंचायतच्या बनपुरा गावचे मूळ रहिवासी होते. सामाजिक कार्यात ते कायम सक्रिय होते, तयांच्या मनमिळावू स्वभावासोबतच जनसेवेच्या कार्यामुळे ते परिसरात लोकप्रिय होते. गरीब आणि गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असत.
पॅक्स अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना वीरेंद्र पांडे यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी तसेच कृषी विकासासाठी विविध उपक्रम राबवले. भाजपचे सक्रिय आणि समर्पित नेते म्हणून त्यांनी पक्ष संघटना तळागळात मजबूत करण्यासाठीही काम केले.
वीरेंद्र पांडे यांच्या निधनावर खासदार जनार्दन सिंह सिग्रीवाल यांनी शोक व्यक्त केला. वीरेंद्र पांडे हे भाजपचे मजबूत कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली असल्याचे सिग्रीवाल यांनी म्हटले.
वीरेंद्र पांडे यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर बनपुरा येथील त्यांच्या पैतृक निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी समर्थक, ग्रामस्थ आणि विविध नेत्यांची मोठी गर्दी झाली. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे भरेपूर कुटुंब आहे.