चंद्रकांत पाटील यांचा दावा म्हणाले,  'ती' एक मनपा वगळता २९ पैकी २८ मनपा महायुती जिंकणार
चंद्रकांत पाटील यांचा दावा म्हणाले, 'ती' एक मनपा वगळता २९ पैकी २८ मनपा महायुती जिंकणार
img
वैष्णवी सांगळे
नगर परिषद निवडणुकीच्या दणदणीत विजयानंतर भाजपाने २९ महानगपालिका निवडणुकांमध्येही भाजपचाच दणदणीत विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यात मतदान होत असलेल्या २९ पैकी २८ महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसेल, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील हे सांगली येथे प्रचारसभेला आले असताना त्यांनी मोठा दावा केला आहे ते म्हणाले राज्यात मतदान होत असलेल्या २९ महानगरपालिकांपैका २८ महानगरपालिकांमध्ये महायुतीचा विजय होईल. तिथे महायुतीचा महापौर बसेल. त्यात कुठे भाजपाचा, कुठे शिंदेसेनेचा तर कुठे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा   महापौर असेल. अर्थातच त्यात भाजपाचे सर्वाधिक महापौर असतील. 

मी यातून एक महानगरपालिका वगळली आहे. ती महानगरपालिका म्हणजे मालेगाव, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी असलेल्या सांगली महानगरपालिकेमध्येही भाजपाचा विजय होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group