उमेदवारी अर्जासाठीही पैसे नव्हते, उधार पैसे घेतले, निवडणूक लढला अन जिंकला सुद्धा ; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
उमेदवारी अर्जासाठीही पैसे नव्हते, उधार पैसे घेतले, निवडणूक लढला अन जिंकला सुद्धा ; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या विजयाची जेवढी चर्चा आहे तेवढी चर्चा राज्यात सध्या एमआयएमला मिळालेल्या यशाची देखील आहे. पालिका निवडणुकांमध्ये खासदार असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमला देखील मोठं यश मिळालं असून पक्षाने  १२५ जागा जिंकल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ३३ नगरसेवक छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयी झाले आहेत.

असे असताना मुंबईतील  एआयएमआयएम विजयी हिंदू उमेदवार सध्या चर्चेत आहे. गोवंडीमधील वॉर्ड क्रमांक 140 मधील 16 उमेदवारांना पराभूत करणारे विजय उबाळे हिंदू उमेदवार असून चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी 4,945 मतांनी विजय मिळवला. 

विशेष म्हणजे, असं बोललं जात आहे कि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि वकिलांची फी भरण्यासाठी उबाळे यांच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. रुपयेही नव्हते. अशा उमेदवारावर ओवेसींनी विश्वास दर्शवला आणि विजय उबाळे यांनी तो विश्वास सार्थकी लावलाय.या प्रभागात मुस्लिम मतदारांची संख्या 50% पेक्षा जास्त आहे. या प्रभागात त्यांना एकूण 25, 950 मते पडली, ज्यामध्ये उबाळे यांना २०% मते मिळाली. 

विजय उबाळे यांनी सोमय्या कॉलेजमधून बी.एससी. पदवी घेतली आहे आणि ते व्यवसायाने शिक्षक आहेत. विजय उबाळे खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये गणित शिकवतात आणि 2024 च्या राज्य विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएममध्ये सामील झाले. 

स्थानिक एआयएमआयएम नेते आणि शिक्षक अतिक खान म्हणाले की विजय सरांचा धर्म महत्त्वाचा नाही. ते बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्यापासून प्रेरित आहेत आणि भारतीय संविधानाबद्दलचे त्यांचे ज्ञान आणि त्यांच्या वर्तनाने ते प्रभावित आहेत. प्रभाग 140 दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागलेला आहे. एका मतदारसंघाचे नेतृत्व समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि दुसऱ्या मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक करत आहेत. मतदार दोन्ही पक्षांवर नाराज होते आणि त्यांना तिसरा पर्याय हवा होता, त्यांच्या स्थानिक समस्या समजून घेणारा. म्हणून विजय सर जिंकले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group