मोठी बातमी समोर येत आहे, आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यात महापालिका निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, अखेर आता निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचं देखील निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच उमेदवारांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमापत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे.
मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची आज सोमवारी घोषणा करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकीच्या घोषणेमुळे आता २९ पालिका हद्दीत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
अर्जाची छाननी - 31 डिसेंबर
उमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारी
चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारी
मतदान - 15 जानेवारी
निकाल - 16 जानेवारी