लवकरच निवडणुकांचं बिगुल ! मिनी विधानसभेचं संभाव्य वेळापत्रक समोर
लवकरच निवडणुकांचं बिगुल ! मिनी विधानसभेचं संभाव्य वेळापत्रक समोर
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही वर्षांपासून थांबलेल्या मिनी विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजणार आहे. राज्यातील निवडणुका तीन टप्प्यात होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पुढील आठवड्यात निवडणूक आयोग राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा कऱणार आहे. 



राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. आयोगाकडून पुढील आठवड्यात निवडणुकीची घोषणा करण्यात येऊ शकते. पहिल्या टप्प्यात नगरपालिका, तर अखेरच्या टप्प्यात महापालिका निवडणुका होऊ शकतात. महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचा प्लान आयोगाकडून आखण्यात आला आहे. 



मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. नगरपालिका निवडणुकीची घोषणा सोमवारी किंवा मंगळवारी केली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होईल.

१५ ते २० जानेवारी दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रत्येक टप्प्यातील निवडणुकांची मतमोजणी दुसऱ्या दिवशी होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group