राज्यातील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान , कुठे बोगस मतदार पकडले, तर कुठे मतदान यंत्रच ठप्प पडली
राज्यातील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान , कुठे बोगस मतदार पकडले, तर कुठे मतदान यंत्रच ठप्प पडली
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी पार पडल्या होत्या, मात्र त्या पैकी २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण १४३ सदस्यपदांसाठी आज  मतदान होत आहे.

आज अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, सोलापूरातील अनगर, मंगळवेढा, साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणसह 23 नगरपरिषदांमध्ये मतदान होत आहे.  मतदारांचा सकाळपासून मोठा उत्साह पहायला मिळत आहे.

मात्र मतदान होत असलेल्या काही ठिकाणी गौरप्रकार झाल्याने मतदानाला गालबोट लागल्याचं दिसून आलं. अंबरनाथमध्ये २०८ संशयित मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्या सर्वांची आधार कार्ड व पॅन कार्डद्वारे सखोल तपासणी करण्यात आली. हे नागरिक मतदानासाठी आले होते का, कोणासाठी मतदान करणार होते याचीही चौकशी करण्यात आली.  या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण तापलं होतं. 

तर दुसरीकडे यवतमाळमध्ये एका मतदान केंद्रावर EVM मध्ये बिघाड झाल्याचे आढळले. मतदाना केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, मात्र EVM बिघडल्याने मतदान करता येत नसल्याने अनेक मतदार खोळंबले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group