मोठी बातमी: दर २० दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार
मोठी बातमी: दर २० दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार
img
वैष्णवी सांगळे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल नोव्हेंबर महिन्यापासून वाजण्यास सुरुवात होणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण होऊन लोकप्रतिनिधींचे राज्य सुरु होईल. नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका- नगरपंचायत, त्यानंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होतील. 


दर वीस दिवसांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या तयारीला दिवाळीनंतर वेग येईल असे मानले जात आहे. जानेवारीच्या शेवटापर्यंत सर्व निवडणूका पुर्ण करण्याची राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरु आहे. 

जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष पदाची सोडत काढण्यात आली आहे. काही दिवसांत महापालिका आरआरक्षणाची सोडत निघणार असुन प्रभाग रचनेला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावरील प्रशासन राज संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींच राज्य येणार आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group