काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराच्या मुलाने सोडला हात, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराच्या मुलाने सोडला हात, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
img
वैष्णवी सांगळे
राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आल्याचं पहायला मिळत आहे.  ऐनवेळी नेते आणि पदाधिकारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्यानं अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे, दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत असून, काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 



काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अशोक जाधव यांचा मुलगा कुणाल जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या मध्यस्थीने मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कुणाल जाधव यांनी शिवबंधन बांधत ठाकरेसेनेत अधिकृत प्रवेश केला.

या प्रवेशामुळे अंधेरी पश्चिममधील काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.पक्षाला लागलेली गळती काँग्रेससाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे, त्यातच आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group