महापालिका निवडणुकीदरम्यान नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. नाशिकमधील दोन माजी महापौर शिवसेना शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. आज हे दोन्ही नेते थोड्याच वेळात मुंबईत शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.
माजी महापौर अशोक मुर्तडक व दशरथ पाटील हे दोघे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आज सकाळी मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासमवेत माजी खासदार हेमंत गोडसे उपस्थित आहे. अशोक मुर्तडक हे प्रभाग ५ मधून शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार असून, त्यांच्या प्रवेशाने ते अधिकृत होतील. दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता.