लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी ! लाडक्या बहिणींची आता घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी होणार
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी ! लाडक्या बहिणींची आता घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी होणार
img
वैष्णवी सांगळे
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत अनेक महिला निकषात असूनदेखील केवायसीतील काही अडचणींमुळे त्यांचा लाभ बंद झाला. यामुळेच योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे.

अनेक महिलांनी केवायसी करुन देखील त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आता लाडक्या बहि‍णींची पडताळणी करण्याच्या केवायसीबाबत पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. 

आता या लाभार्थ्यांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांद्वारे प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. यामुळे आता अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे. त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group