मोठी बातमी ! BMC निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता
मोठी बातमी ! BMC निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता
img
वैष्णवी सांगळे
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मुंबई महानगर पालिका निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने गुरूवारी सर्व महानगरपालिका आयुक्तांसोबत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. येत्या सोमवारी दुसरी आढावा बैठक घेण्यात येईल. त्यामुळे लवकरच निवडणूक जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हॉटेल गंमत जंमतजवळ कार पलटी; दोन जण गंभीर जखमी

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांपैकी अनेक महानगरपालिका निवडणुकीची तयारी पूर्ण करत आहेत. मतदार यादीतील दुहेरी नोंदींची यादी तयार करण्यासोबतच इतर कामं देखील वेगाने सुरू आहेत. अनेक महानगरपालिकांचे असे म्हटले आहे की, ते अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या १० डिसेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी डुप्लिकेट मतदारांची ओळख पटवून देण्याचे आणि त्यांना चिन्हांकित करण्याचे काम पूर्ण करण्याचे वेळापत्रक पूर्ण करत आहेत.

तर, मुंबई महानगरपालिकेने आणखी काही दिवस मागितले आहेत. कारण मतदार यादीत मतदारांची नावं दुबार आहेत की नाही हे पडताळण्यासाठी बीएमसीला आणखी वेळ पाहिजे आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group