नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कार पलटी होऊन झालेल्या अपघातात कारमधील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गंगापूर रोडवर घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, काल रात्री ११ वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील गंमत जंमत हॉटेलजवळ एक कार पलटी झाली. या अपघातात गाडीमध्ये असलेले जय बोरसे (वय २३) व त्याचा मित्र अथर्व तुपे हे दोघे गंभीर जखमी झाले असून दोघांना उपचारासाठी गंगापूर रोड वरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.