नाशिक : साक्षी गणेश मंदिरातून दोन किलो चांदीच्या मूर्तीची चोरी
नाशिक : साक्षी गणेश मंदिरातून दोन किलो चांदीच्या मूर्तीची चोरी
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : भद्रकाली परिसरातील साक्षी गणेश मंदिरातून दोन किलो चांदीची मूर्ती चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने दोन किलो चांदीच्या मूर्तीची चोरून नेली. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मंदिराचे पुजारी दिलीप चंद्रिकाप्रसाद दुबे (वय 48, रा. हिरावाडी, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने साक्षी गणेश मंदिरात प्रवेश केला. या चोरट्याने मंदिरातील जुनी वापरती दोन किलो वजनाची एक लाख रुपये किमतीची चांदीची मूर्ती चोरून नेली. 

या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार काकड करीत आहेत. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group