60 वर्षांच्या  शेतमजुराने दिली बिबट्याशी झुंज
60 वर्षांच्या शेतमजुराने दिली बिबट्याशी झुंज
img
Nandini khandare More


दिंडोरी:- तालुक्यातील ओझे येथे 60 वर्षांच्या शेतमजूराने सतत दहा मिनिंट बिबट्याशी झुंज देवून आपले प्राण वाचवले. त्यांनी बिबट्याशी झुंज देवून आपले प्राण वाचवल्यामुळे परिसरातून कौतुक होत आहे.ओझे येथील बाळू धोंडीराम धुळे हे शेतमजूर प्रवीण शिंदे यांच्या ऊसाला पाणी देण्यासाठी गेले असता ऊसाच्या सर्या भरल्या की नाही हे पाहत असतांना अचानक बिबट्याची मादी ऊसातून त्यांच्यासमोर येवून उभी राहिली व मोठमोठ्या डरकल्या फोडू लागली. त्यामुळे धुळे हे भयभित झाले, त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावर धाव घेऊन उडी मारली. मात्र त्याचवेळेस धुळे खाली बसले व काठी फिरवत राहिले. बिबट्या त्यांच्यापासून पुढे जावून पडला व पुन्हा त्यांच्यासमोर येवून मोठमोठ्याने आवाज करु लागला. जवळजवळ तीन वेळेस बिबट्याने त्यांच्यावर धाव घेऊन त्यांना पकडण्याचा  प्रयत्न केला मात्र धुळे हे शेतमजूर चपळ असल्यामुळे त्यांनी बिबट्याला आपल्या अंगावर पडू दिले नाही.

मात्र वयाच्या 60 वर्षे ओलडलेल्या व शरिरीराने थकलेल्या माणसांने बिबट्याशी दहा मिनिटे झुंज देवून आपले प्राण वाचवले. या घटनेविषयी बोलतांना धुळे यांनी सांगितले की, मी जवळजवळ संपलो म्हणूनच बिबट्याशी झुंज देत राहिलो, मात्र मनातून आपण आता येथे संपणार आहे असे मनात ठरवून ठेवले होते. मात्र थोड्याच वेळात बिबट्याच्या मादीच्या पिल्ल्याची हालचाल ऊसाच्या शेतात चालू होती, त्यामुळे त्या मादीचे लक्ष विचलित झाले व ती आपल्या बछड्यांना पाहण्यासाठी तोंड फिरवून घेतले. त्याचवेळेस झुंज देवून थकलेल्या बाळू धुळे यांनी जोरात धुम ठोकली. त्यावेळी त्यांनी समोर काटेरी झाडेझुडपे यांचा विचार न करता तेथून बाहेर पडले. पळत असतांना हात -पाय, डोक्याला अनेक ठिकाणी काटे टोचले, मात्र जीव वाचवण्यासाठी धुळे यांनी लांब सुरक्षित जाण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी झाला.

मात्र सदर घटनेमुळे ऊसाच्या शेतात पाणी भरण्यासाठी मजूर जाण्यास तयार नाही. त्यामुळे ऊसाला पाणी कसे द्यायचे? असा प्रश्‍न शेतकर्यांपुढे निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात बिबट्याने शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, मांजरे आदींसह अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले करुन ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये दहशत कायम आहे. सदर परिसरात बिबट्या व त्यांच्या बछड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शेतात काम करणारे शेतमजूरांवर परिणाम होवून कुणी कामास येण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकर्यांना स्वत:च शेतीचे कामे करावी लागत आहे. त्यामुळे वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या परिसरात बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरे लावण्यात यावे, अशी मागणी  होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ऊसाच्या शेतात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून अनेक वेळा याच बिबट्याने दर्शन दिले होते. मात्र याआधी सदर बिबट्या माणसांवर चाल करत नव्हता. परंतू आज बिबट्या अचानक अतिशय खवलेला दिसला व तो माझ्या अंगावर तीन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र माझ्या एका हातात काठी व दुसर्या हातात विळा असल्यामुळे तो अंगावर जास्त चाल करुन शकला नाही. त्यामुळे मी बिबट्याच्या तावडीतून थोडक्यात वाचलो. शेवटी असे म्हणता येंईल की ‘देव तारी त्याला कोण मारी’, अशी म्हणण्याची वेळ आली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group