१०० एकरचा मांडप अन् ग्रामीण संस्कृतीचा थाट; इंदोरीकर महाराजांच्या लेकीचे लग्न ठरले राज्याच्या चर्चेचा विषय!
१०० एकरचा मांडप अन् ग्रामीण संस्कृतीचा थाट; इंदोरीकर महाराजांच्या लेकीचे लग्न ठरले राज्याच्या चर्चेचा विषय!
img
नितीशा कुलकर्णी





संगमनेर: साधी राहणी पण भव्य विचार मांडणाऱ्या इंदोरीकर महाराजांच्या घरी रविवारी सनई-चौघड्यांचे सूर घुमले. संगमनेरच्या भूमीत पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्यात केवळ वारकरी संप्रदायच नाही, तर महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्वही नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. परंपरेला आधुनिकतेची जोड देत पार पडलेला हा सोहळा सध्या सोशल मीडियावर आणि जनमानसात चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा रविवारी (३ मे) संगमनेर येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाहासाठी तब्बल १०० एकर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला होता.

विविध मान्यवरांची उपस्थिती

या विवाह सोहळ्यासाठी राज्यभरातून दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार तसेच वारकरी आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यानगर, पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमधील नागरिकांनीही या सोहळ्याला मोठी गर्दी केली होती.

किती लोकांची उपस्थिती?

या विवाह सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितीबाबत मोठी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “इंदोरीकर महाराज हे आपल्या साध्या आणि विनोदी कीर्तन शैलीमुळे लोकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना नेहमीच मोठी गर्दी असते. या लग्नालाही एक लाखांहून अधिक लोक उपस्थित होते.”

वारकरी परंपरेचा गौरव

शिंदे यांनी यावेळी वारकरी परंपरेचाही उल्लेख केला. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय ही अत्यंत समृद्ध परंपरा असून इंदोरीकर महाराजांनी भजन-कीर्तनातून समाजप्रबोधन करण्याचे मोठे कार्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले.

 रूखवत मांडणीने वेधले

लक्षया शाही विवाह सोहळ्यात रूखवत मांडणी आणि पारंपारिक देखाव्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. ग्रामीण संस्कृतीची जिवंत झलक पाहायला मिळाल्याने पाहुण्यांसाठी हा एक खास अनुभव ठरला.

परंपरा आणि आधुनिकतेचा संगम

साखरपुडा, हळद, वऱ्हाडी स्वागत ते मुख्य विवाह सोहळा. प्रत्येक विधी अत्यंत देखण्या पद्धतीने सादर करण्यात आला. पारंपारिक वस्तू, शेतीशी संबंधित देखावे आणि जुन्या संस्कृतीचे दर्शन यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. विविध गोडधोड पदार्थांची आकर्षक मांडणीही करण्यात आली होती.

हा  सोहळा ठरलला  चर्चेचा विषय

भव्य आयोजन, मोठी उपस्थिती आणि पारंपारिकतेचा सुंदर आविष्कार यामुळे इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा हा विवाह सोहळा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group