महाराष्ट्राला अवकाळीचा विळखा आणि उष्णतेची लाट! पारा ४४ अंशांवर चढला; 'या' जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट!
महाराष्ट्राला अवकाळीचा विळखा आणि उष्णतेची लाट! पारा ४४ अंशांवर चढला; 'या' जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट!
img
नितीशा कुलकर्णी






विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट उष्णतेणे होरपळून निघाला आहे. आता मात्र सगळ्यांना पासची आतूरता लागली आहे. अशातच आता हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. विदर्भात वारं फिरलं असून आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला अवकाळी संकटानं घेरलं आहे. महाराष्ट्रात उन्हाळी हवामानासोबत अवकाळी पाऊस, गडगडाट आणि वादळी वारे येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 7 मे रोजी काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही भागात वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर कोकणात पुन्हा उष्ण व दमट हवामान हैराण करणार आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

कोकणात गेल्या काही काळापासून उष्ण आणि दमट हवामानाने घाम काढला आहे. आज पुन्हा मुंबईसह सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 72 तास हवेतील आद्रता प्रचंड वाढणार असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तर दक्षिण कोकणात उकाड्यासोबत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमाल तापमान 32-35 अंश सेल्सिअस राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तास अवकाळी अलर्ट जारी केला आहे. पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर भागात ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील.

तसेच गडगडाटी पावसाची शक्यता आहे. घाट भागात पावसाचं तुफान जाणवेल. कमाल तापमान 37-40 अंशांच्या दरम्यान राहील. उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा पारा चढलेलाच राहील. कमाल तापमान 40-44 अंशांपर्यंत जाईल. तर किमान 22-26 अंशांपर्यंत नोंदवलं जाईल. हवामान मुख्यत: उष्ण आणि कोरडे राहील. अहिल्यानगर भागात गडगडाटी पावसाची शक्यता आहे. मराठाड्यात देखील हवामानाची विचित्र स्थिती जाणवत आहे. ऐन उन्हाळ्यात काही जिल्ह्यांना वादळी पाऊस झोडपणार आहे. तर काही ठिकाणी उष्णतेचा पारा पुन्हा चढेल. आज बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कमाल तापमान 39-43 अंशांवर राहील.

गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसानं विदर्भाला झोडपून काढलं. मात्र, विदर्भातून आलेलं हे संकट आता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर कोकणात गेलं आहे. आज विदर्भात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान पुन्हा 40-44 अंशांवर जाईल. काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असली तरी महत्त्वाचा अलर्ट नाही. दरम्यान, महाराष्ट्रावर वादळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचं दुहेरी संकट घोंघावत आहे. 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल. त्यामुळे दुपारच्या वेळी बाहेर जाणं टाळावं. तसेच विजा आणि वादळी वाऱ्यापासून सावध राहावं. शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी.

इतर बातम्या
Join Whatsapp Group