उन्हाच्या झळांनंतर आता पावसाच्या सरी! मराठवाडा आणि विदर्भाला दिलासा मिळणार; वाचा हवामान अपडेट
उन्हाच्या झळांनंतर आता पावसाच्या सरी! मराठवाडा आणि विदर्भाला दिलासा मिळणार; वाचा हवामान अपडेट
img
नितीशा कुलकर्णी










महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्याच्या उष्णतेत वाढ होत आहे. एसी, कुलर समोरून उठून बाहेर आलात किंवा लाईट गेल्यास अंगाची लाहीलाही होते. बाहेरून येणाऱ्या गरम झळांनी अंग भाजत असल्यासारखं वाटते. मुंबई, उपनगर, ठाण्यासह कोकणात उन्हाचा कडाकाड प्रचंड वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तर तापमान 45 डिग्रीपेक्षा जास्त गेलं आहे. आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झालं आहे. तर राजस्थान आणि झारखंडच्या आसपास सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे.

उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या महाराष्ट्रासाठी आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशाच्या दक्षिण टोकावर म्हणजेच केरळमध्ये १ जूनच्या सुमारास मान्सून पोहोचण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. मात्र, यंदा अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असल्याने अंदमानमध्ये मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे.

महाराष्ट्रात कुठे पाऊस, कुठे ऊन?
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भाग वगळता राज्याच्या इतर भागांत हवामान प्रामुख्याने कोरडे आहे. मात्र, मराठवाड्यात ७ मेपासून पावसाची शक्यता वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह जळगाव, नाशिक, मालेगाव आणि अहिल्यादेवीनगर (अहमदनगर) भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. इथे पावसाची शक्यता तूर्तास कमी आहे. या भागात मात्र उष्णता जास्त वाढणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात छत्रपती संभाजीनगरमध्ये हवामान कोरडे असले, तरी ७ मे रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. विदर्भात गोंदिया आणि आसपासच्या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.

कुठे होणार पाऊस
लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, सांगली या जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. येत्या २४ ते ४८ तासांत राजस्थानात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. या वेदर सिस्टममुळे उत्तर भारतात दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचा प्रभाव महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरही जाणवू शकतो. विशेषतः दुपारनंतर वाढणाऱ्या उष्म्यामुळे स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन काही ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.३) मान्सूनचा प्रवास आणि अडथळे साधारणपणे १५ मेच्या सुमारास मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर पोहोचतो. यंदा अरबी समुद्रातील वादळी हालचालींमुळे हा प्रवास काहीसा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. 'अल-निनो'च्या प्रभावामुळे यंदाचा मान्सून काहीसा कमकुवत राहण्याची भीती असली, तरी काळजी करण्याचे कारण नाही, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group