बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिले बाजी मारणार? निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!
बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिले बाजी मारणार? निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!
img
नितीशा कुलकर्णी





संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपासून कडक पोलीस बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली असून, प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. या निकालातून बारामतीत सुनेत्रा पवार आणि राहुरीत अक्षय कर्डिले बाजी मारणार का? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली. या मतमोजणीच्या कामकाजाकरिता पुरेशा अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

निकालाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात असून, त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीसाठी २० टेबल, तर पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी ६ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी ३० सूक्ष्म निरीक्षक, ३० मतमोजणी पर्यवेक्षक, ३० मतमोजणी सहायक तसेच इतर कर्मचारी व अधिकारी मिळून सुमारे ३०० कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा.

निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांच्याकडून मतमोजणी करिता नियुक्त कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. दुसरीकडे राज्यातील जनतेचे लक्ष हे राहुरी पोटनिवडणूकीकडे असणार आहे. अजित पवार आणि शिवीजी कर्डिले यांच्या निधनानंतर या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक पार पडली. बारामतीत सुनेत्रा पवार आणि राहूरीत राहूरीत अक्षय कार्डिले यांचा विजय निश्चित मानला जात आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group