आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, एकनाथ शिंदेंचाा मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला आहे. त्यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं होतं मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे एका लग्नासाठी जात असताना ही घटना घडली आहे. मात्र याआधी, फेब्रुवारी 2026 मध्ये अजित पवारांच्या अपघातानंतर शिंदे गटाने व्हीएसआर कंपनीची विमाने न वापरण्याचा निर्णय घेतला होता.
अपघाताची सविस्तर महिती
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ शिंदे हे लग्नासाठी जात असताना शिंदे यांचं हेलिकॉप्टर कल्याणमध्ये वादळात अडकलं. एकनाथ शिंदे हे महालक्ष्मी रेसकोर्सहून लग्नासाठी मुरबाडला जात होते, त्याचदरम्यान त्यांचं हेलिकॉप्टर कल्याणमध्ये वादळात अडकलं. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर जुहू एयरपोर्टवर इमर्जेंसि लॅंडिंग करण्यात आलं.