भीषण : वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक ! 12 जणांचा मृत्यू
भीषण : वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक ! 12 जणांचा मृत्यू
img
Nandini khandare More
आजकाल अनेक भीषण अपघाताच्या घटना घडत आहेत. अशाच एका अपघाताने आंनदी वातावरणात विरझन टाकले आहे. अत्यंत हृदयद्रावक अशी घटना पालघर येथे घडली आहे.  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० ते २५ जण जखमी आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार,  पालघरच्या धानीवरी येथे वऱ्हाडाची ट्रक आणि कंटेनर मध्ये भीषण अपघात झाला आहे.  बालाराम दांडेकर नावाच्या तरुणाचा साखरपुडा होता. साखरपुड्यासाठी वऱ्हाडी हे ट्रकमधून जात होते. धानीवरी इथं मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पोहोचले असता त्याचवेळी समोरून एक भरधाव कंटेनर येत होता. अचानक कंटेनरचा मागील डब्बा निसडला. आणि ट्रकवर येऊन आदळला. कंटेनर धडकल्यामुळे वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक दूर फेकला गेला. ट्रकच्या मागील भाग पूर्णपणे वाकला.

वऱ्हाडाच्या ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत तीन ते चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातात वीस ते पंचवीस जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू  आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group