समृद्धीवर मृत्यूचा थरार! टायर फुटल्याने भीषण अपघात; २ जणांचा होरपळून मृत्यू
समृद्धीवर मृत्यूचा थरार! टायर फुटल्याने भीषण अपघात; २ जणांचा होरपळून मृत्यू
img
Nandini khandare More

गेल्या अनेक दिवसांपासून समुद्धी महामार्गावर अनेक भीषण अपघात घडत असून आता आणखी एका थरारक घटना घडली आहे. 
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर आज सकाळी दुर्दैवी अपघात घडला. धावत्या ट्रकचा अचानक टायर फुटल्याने ट्रकला भीषण आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. या अपघातात ट्रकमधील दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. समृद्धी महामार्गावरील चॅनेल नंबर १२७ जवळून हा ट्रक जात होता. हा ट्रक फुलकोबी (फ्लॉवर) घेऊन जात होता. त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली.

समृद्धी महामार्गावरून जात असताना अचानक ट्रकचा टायर मोठ्या आवाजासह फुटला. टायर फुटल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकला अचानक आग लागली. आग इतकी वेगाने पसरली की ट्रकमध्ये बसलेल्या दोन जणांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. ट्रकला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली अन् या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group