अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा डाव फसला ; अपहरणकर्त्यासोबत झाले असे काही...
अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा डाव फसला ; अपहरणकर्त्यासोबत झाले असे काही...
img
वैष्णवी सांगळे
बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये एक थरारक घटना घडली आहे. अपघात होणं हे वाईट असलं तरी या घटनेत मात्र कारचा अपघात झाला ते चांगलंच झालं. 
कारण अपघातामुळे अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा डाव फसलाय.दरम्यान थरारक प्रकार अपहरणाचा आहे की प्रेम प्रकरणाचा याचा तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत. 


नेमकं काय घडलं ? 
मलकापूरहून एका सोळा वर्षीय युवतीचे अपहरण करण्यात आले. यानंतर तिला घेऊन जाणारी कार मोताळ्यात पोलिसांनी रोखली. दरम्यान पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पुढे सुसाट निघाली. पण गाडीचे टायर फुटले आणि सदर गाडी बाजूच्या एका शेतामध्ये जाऊन अपघातग्रस्त झाली. यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत मुलीची सुटका केली आहे. 

मुलीचे अपहरण करण्यात आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी मलकापूर पोलिसांत धाव घेतली. पोलीस प्रशासनाकडून बोराखेडी पोलिसांना सुचित करण्यात आले होते. त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी आज सकाळी नऊ वाजेपासून साक्षी हॉटेल जवळ आणि बोराखेडी फाटा अशा दोन ठिकाणी नाकाबंदी केली होती. 

दरम्यान लाल रंगाची कार साक्षी हॉटेल जवळ थांबवण्यात आली. परंतु अपहरण करणाऱ्या आरोपींनी गाडी थांबवण्याचे नाटक केले आणि पोलीस जवळ येत असल्याचे पाहून पुन्हा गाडी सुसाट पुढे नेली. तर बोराखेडी फाट्याजवळच्या नाकेबंदीला पण त्यांनी न जुमानता गाडी सुसाट वेगाने नेली. यानंतर पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरु केला होता. 

सदरची गाडी बुलढाण्याच्या दिशेने टाकली तेव्हा गाडीचे टायर फुटले आणि गाडी थेट शेतात घुसली. त्याठिकाणी सर्व आरोपीना ताब्यात घेण्यात आले. तर गाडीचा पिच्छा करणाऱ्या दुसऱ्या गाडीतील लोक अत्यंत आक्रमक होते. तिथे जमलेल्या काही जमावाने मिळून सदर कार जाळण्याचा प्रयत्न केला गेला. तर आरोपी मुलांना जबर मारहाण सुद्धा करण्यात आली. अर्थात हा प्रकार अपहरणाचा आहे का याबाबत प्राथमिक शंका व्यक्त होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group