सात दिवसाने का मरता आताच मरा… नायब तहसीलदाराचा शेतकऱ्याला संतापजनक सल्ला
सात दिवसाने का मरता आताच मरा… नायब तहसीलदाराचा शेतकऱ्याला संतापजनक सल्ला
img
वैष्णवी सांगळे
हतबल झालेल्या  खचलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी उपदेशच दिले जातात. राजकीय नेतेही यात मागे नाहीत आणि सरकारी अधिकारीही. बुलढाण्यातील नायब तहसीलदार निखिल पाटील यांनी शेतकऱ्याला संतापजनक सल्ला दिलाय. शेताला रस्ता मिळत नाही म्हणून आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला नायब तहसीलदार निखिल पाटील यांनी आत्महत्या करण्याता सल्ला दिला आहे. 



“सात दिवसाने का मरता, मी पेट्रोल आणून देतो, आताच मरा” असं निखिल पाटील यांनी या शेतकऱ्याला सांगितलं. यानंतर संतप्त शेतकऱ्याने खामगाव तहसील कार्यालयावर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र वेळीच तिथे हजर असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले त्यामुळे या शेतकऱ्याचा जीव वाचला. 

गोविंदा महाले या शेतकऱ्याने म्हटले की, मी साहेबांकडे अर्ज घेऊन गेलो होते. मी म्हटलं हा आत्मदहनाच्या इशाऱ्याचा अर्ज आहे. ते म्हणाले सात दिवसांनी का मरता, मी एक लिटर पेट्रोल आणून देतो, आत्ताच मरा. यामुळे माझी मनस्थिती खराब झाली. त्यामुळे मी आत्महत्या करण्यासाठी वर चढलो होतो. माझ्या शेतासाठी मला रस्ता मिळावा ही माझी मागणी आहे.

या घटनेनंतर शिवसेना पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना शेतकऱ्याला तुम्ही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत पेट्रोल आणून देण्याची भाषा का करता? असा जाब विचारला. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या समाधान न करता निखिल पाटील यांनी तहसील कार्यालयातून पळ काढला. त्यामुळे हे सरकारी अधिकारी असे मुजोरपणाने वागू लागले असल्याचे पाहायला मिळाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group